दानिविपचे अध्यक्ष रमजान अत्तार यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश…

0
248

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : दानिविप अध्यक्ष रमजानभाई अत्तार यांनी आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अत्तार यांची संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रमजान अत्तार यांचा जनसंपर्क मोठा असल्याने तसेच दानिविप ही संघटनाही त्यांच्या सोबत असल्याने याचा मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे. वंचित घटकांसाठी त्यांच्या हक्कांसाठी नेहमी अग्रेसर असणारे अत्तार यांच्या राष्ट्रवादीमध्ये केलेल्या प्रवेश्याने आगामी नगरपालिका निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीला निश्चितच फायदा होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.