जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतोय : चोवीस तासांत चौघांचा मृत्यू…

0
419

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मागील चोवीस तासांत ८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. दिवसभरात ३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ७३६ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर शहरातील २३, भूदरगड तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १२, कागल तालुक्यातील ३, करवीर तालुक्यातील २०, पन्हाळा तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १२ आणि इतर जिल्ह्यातील ९ अशा ८१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आजरा तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील आर. के. नगर, यड्राव येथील १ आणि हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील १ अशा चार्जांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

कोरोना बाधित रुग्ण – ५१, ५५७, डिस्चार्ज – ४९,१४९, उपचारासाठी दाखल रुग्ण – ६४५, मृत्यू – १७६३.