भिंत कोसळून कारचे नुकसान

0
54

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बाबूजमाल रोड येथे भिंत कोसळून कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली.या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.

ही भिंत धोकादायक स्थितीत होती आणि ती पाडण्यासाठी मालकांना नोटीस बजावली होती. यासाठी जानेवारी महिन्यापासून पाठपुरावा सुरु होता; मात्र नोटीस आजपर्यंत लागू झाली नसल्याचे संबंधिताकडून सांगण्यात आले. ज्या घरातील कारवर ही भिंत पडली, त्या घरात मंगल कार्य आहे. केदार मोहिते आणि कुटुंबीयांच्या घराची भिंत संजय गवळी यांच्या घराच्या पार्किंगमध्ये कोसळली.