कळे (प्रतिनिधी) : सोसाट्याचा वारा व पावसामुळे खेरीवडे (ता.पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेचे नुकसान झाले. येथे वाकोबा मंदिराला लागून शाळेच्या दोन खोल्या आहेत. यापैकी एका खोलीची भिंत कोसळून सुमारे पंचवीस हजाराचे नुकसान झाले.

याचबरोबर घरपण येथे कोल्हापूर-गगनबावडा मार्गाशेजारी असलेल्या बंडोपंत कृष्णात चौगले यांच्या राहत्या घराची स्वंयपाक खोलीची भिंत शेजारी असलेल्या शेतवडीत पडली. सुमारे तीस हजाराचे नुकसान झाले. तलाठी अमर पाटील व कोतवाल पंढरीनाथ सूर्यवंशी यांनी पंचनामा करून तहसीलदार कार्यालयाला ऑनलाईन माहिती पाठविली. तसेच कांही ठिकाणी शेतातील पिक आडवी झाली. तर विद्युत तारा तुटल्या आहेत. झाडे मोडून पडली आहेत.