रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

0
34

मुंबई  (प्रतिनिधी) : दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी  आज (गुरुवारी)  पत्रकार परिषदेत केली. भारतीय चित्रपटसृष्टीत दादासाहेब फाळके पुरस्कार प्रतिष्ठित मानला जातो.

प्रकाश जावडेकर म्हणाले की,  महान नायक रजनीकांत यांना २०१९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. रजनीकांत गेली अनेक दशके सिनेमावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांचे अभिनेते, निर्माते आणि लेखक म्हणून सिनेसृष्टीत मोलाचे योगदान राहिले आहे. यावर्षी आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी,  शंकर महादेवन आणि सुभाष घई या निवड समितीतील सदस्यांनी एकमताने रजनीकांत यांच्या  नावावर शिक्कामोर्तब केले. दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी रजनीकांत यांचे अभिनंदन केले आहे.