‘डी. वाय. पाटील’च्या साकीब मुल्लाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश

0
89

कसबा बावडा (प्रतिनिधी) : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आर्किटेक्चर विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी साकिब मुल्ला याने इटली येथील मँगो आर्किटेक्चर कंपनी प्रायोजित ‘आर्किटेक्चर थिसीस अवॉर्ड्स २०२०’  या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा अंतिम वर्षातील आर्किटेक्चर प्रोजेक्टवर आधारित होती.

इटलीमधील बहुराष्ट्रीय मँगो आर्किटेक्चर कंपनीकडून दरवर्षी लाइव्ह प्रोजेक्टवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. विविध देशांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. साकिब मुल्ला याने ‘सेलेब्रेटींग व्हाईड – द अॅडॅप्टीव्ह रियूज ऑफ क्वारी’  या विषयावर प्रोजेक्ट केला होता. यामध्ये पहिल्या फेजमध्ये क्वारी पार्क, फूड प्लाझा, बोटिंग आणि पर्यटन केंद्र, दुसऱ्या फेजमध्ये रिसॉर्ट, हॉटेल आणि तिसऱ्या फेजमध्ये इन्व्हेन्शन हॉल आणि ऑफिस प्रस्तावित केले आहेत. याबद्दल मुल्ला याला १० हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात आले. सुप्रसिद्ध आर्कि. मोहम्मद पिरदावरी (तेहरान) आणि आर्कि. मिलाड पिरदावरी (तेहरान) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

संस्थेचे अध्यक्ष संजय डी. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य संतोषकुमार चेडे, डीन प्रा. आर. जी. सावंत,  प्रा. आय. एस. जाधव यांनी मुल्ला याचे अभिनंदन केले आहे.