डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे विदयार्थी सर्वच क्षेत्रात आघाडीवर : आ. ऋतुराज पाटील

0
16

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील पॉलिटेक्निचे विद्यार्थी  शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे आ. ऋतुराज पाटील यांनी सांगितले. ते कसबा डॉ. डी.वाय.पाटील पॉलिटेक्निक येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक येथे विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, प्रोजेक्ट, मेहंदी, रांगोळी स्पर्धांमधील विजेते आणि शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आ. ऋतुराज पाटील म्हणाले की, डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकने शैक्षणिक गुणवत्ता जपण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच विद्यार्थ्याना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. भविष्यातील शिक्षणासाठी सातत्याने मार्गदर्शन केले आहे .

प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी पॉलिटेक्निकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील, डॉ. ए. के. गुप्ता यांचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याचेही सांगितले.

यावेळी उपप्राचार्य मीनाक्षी पाटील, प्रा. सचिन जडगे, प्रा अक्षय करपे, प्रा. बी.जी. शिंदे, प्रा. नितीन माळी, प्राध्यापक, विध्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.