डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे शहीद जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात..

0
342

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जम्मू-काश्मीरमध्ये भारतमातेच्या रक्षणासाठी लढताना कोल्हापूरमधील निगवे खालसा गावचे सुपुत्र जवान संग्राम पाटील यांना काही दिवसांपूर्वी वीरमरण प्राप्त झाले. पाटील कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण कोल्हापूरकर उभे आहेत. शहीद जवान संग्राम पाटील यांच्या अपुऱ्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे ३ लाखांचा धनादेश आ. ऋतुराज पाटील यांच्याहस्ते कुटुंबियांकडे सोपविण्यात आला.

याप्रसंगी करवीरचे माजी उपसभापती सागर पाटील, अशोक किल्लेदार, टी. वाय. पाटील, शाहजी किल्लेदार, पी. एम. पाटील, एल. एस. किल्लेदार, जी. जी. पाटील, विलास कांजर, प्रवीण पाटील, संतोष किल्लेदार, संतोष ऱ्हाटोड, राहुल पाटील, संजय गुरव, गजानन पाटील, एकनाथ पाटील, डी. एस. ढगे आदी उपस्थित होते.