गगनबावडा (प्रतिनिधी) : डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखानाच्या तज्ज्ञ संचालकपदी पांडुरंग उर्फ आप्पा पडवळ यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. सांगशी येथील पडवळ घराण्याच्या वतीने यशवंतराव पडवळ यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

आप्पा पडवळ म्हणाले, ‘डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना हा आ. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गरीब शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानून यशस्वी वाटचाल करत आहे. चालू हंगामात कारखान्याने पहिली उचल तीन हजार प्रति टनास देण्याची घोषणा करून यावर्षीच्या ऊसदराची कोंडी फोडली आहे.

यावेळी तुकाराम पडवळ, शिवसेनेचे विलास पडवळ, सुनील पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज पडवळ, सुनील पडवळ यांनी परिश्रम घेतले. यावेळी जयसिंग पडवळ, अशोक पडवळ, प्रदीप पडवळ, सुजित पडवळ, उदय पडवळ, अनिल पडवळ, भगवान पडवळ, सुहास पडवळ, विशाल पडवळ, दीपक कदम, संजय कांबळे, अशोक वरेकर आदी उपस्थित होते.