कोल्हापुरात आता सायबर पोलीस ठाणे कार्यरत..!

0 142

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ऑनलाईन गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरु असलेल्या सायबर सेलचे आता सायबर पोलीस ठाण्यात रुपांतर केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फसवणूक, ओएलएक्स खरेदी फसवणूक, क्रेडीट-डेबिट कार्डबाबत गुन्हे, सोशल मिडिया हॅक करून महिलांची बदनामी, धमकी, ब्लॅकमेलिंग, नोकरी बाबत फसवणूक, नायझेरियन फसवणूक ही पॉन्झी स्कीमद्वारे आर्थिक फसवणूक असे गुन्हे मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर सेलची स्थापना करण्यात आली होती.

सायबर गुन्ह्यात वाढ होत असून यामध्ये प्रामुख्याने कार्पोरेट क्षेत्र आणि बँका यांनी लक्ष्य होत आहेत. यासाठी सायबर गुन्ह्यावर आळा घालणे आणि झालेल्या गुन्ह्यांचा परिपूर्णरीत्या तपास करण्यासाठी या सायबर सेलचे रुपांतर सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. यापुढे महत्त्वाच्या सायबर गुन्ह्यांची दखल घेऊन गुन्हा नोंद करणे व त्याचा तपास करणे यासाठी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे या पोलीस ठाण्यात काम चालणार आहे. नागरिकांनी सायबर गुन्हे विषयक तक्रारी थेट सायबर पोलीस ठाण्यात द्याव्यात असे आव्हानही पो. नि. मोरे यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More