नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू असून, त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, एकनाथ शिंदेकडून आम्हाला प्रस्ताव नाही; पण सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आमदारांची संख्या आहे. त्यामुळे मोठा गट हा एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यामुळे मविआ नेत्यांनी आपल्याकडे जास्त संख्याबळ असल्याचा दावा करणे अयोग्य आहे. याशिवाय, १६ आमदारांना निलंबित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांना निलंबित करता येणार आहे. त्यांच्या आमदारकीला धक्का लागू शकत नाही.

आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदेंना सुरक्षा मिळाली पाहिजे. शिवसैनिकांची गुंडागर्दी चालली आहे. ते फक्त तोडफोड करू शकतात असे नाही. दादागिरी करणे योग्य नाही. त्याला दादागिरीने उत्तर दिले जाऊ शकते. पोलिसांसमोर बोर्ड तोडले जात असतील, तर ते योग्य नाही. शिवसैनिकांना शांतता बाळगण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले पाहिजे.