टोप (प्रतिनिधी) : सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनांचे तसेच गरजू नागरिकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ म्हणून गावागावात कॉमन सर्व्हिस केंद्रची ओळख अधोरेखित झाली आहे. या केंद्र चालकांच्या ‘सीएससी’ क्रिकेट चँम्पियन स्पर्धेला आज (रविवार) मोठ्या उत्साहात पन्हाळ्यावर सुरूवात झाली. 

या क्षेत्रात प्रथमच क्रिकेट स्पर्धाचे नियोजन केले असून अनेक सीएससी केंद्रचालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील टीम सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडू निवडून  जिल्ह्याची एक टिम तयार केली जाणार आहे. तसेच ही टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे.

या क्रिकेट स्पर्धेस सीएससीचे राज्य व्यवस्थापक वैभव देशपांडे आणि इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स व एचडीएफसी ईआरजीओ यांचे विशेष सहकार्य लाभले. सीएससीचे जिल्हा व्यवस्थापक जीवन शिंदे यांनी स्पर्धेचे नियोजन केले. तर केंद्र चालक संदीप पाटील, प्रविण गवळी, राजू धनगर, विशाल जमदाडे, दिग्विजय खवरे आदीसह केंद्र चालकांचे सहकार्य लाभले.