पिंपळगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याली  दिंडेवाडी परिसरात गव्यांनी प्रचंढ धुमाकूळ घातला असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. दिंडेवाडीसह केळेवाडी, भांडेबांबर, तोंदलेवाडी,जकीनपेठ, मुरुक्टे, बारवे ,मानवळे ही गावे जंगलाला लागून आहेत.

सध्या सुगीचे दिवस असून शिवारात भात, भुईमूग,नाचना,ऊस ही पिके आहेत. परंतु, गव्यांचा कळप थेट शिवारात शिरल्यामुळे गवे ती पिके फस्त करून मोठे नुकसान करीत आहेत. त्यामुळे वनविभागाकडून गव्यांचा बंदोबस्त करावा तसेच नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.