गडहिंग्लजमध्ये गुरु-शनि पाहण्यासाठी खगोलप्रेमींची गर्दी…

0
416

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  तब्बल आठशे वर्षांनी एकत्र आलेले गुरू आणि शनि हे ग्रह टेलिस्कोपमधून पाहण्याची सोय भडगांव रोड येथील गडहिंग्लज विज्ञान सेंटर येथे करण्यात आली होती. यावेळी, हे दोन ग्रह तब्बल आठशे वर्षांनी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे हा खूप दुर्मिळ योग असल्याचे येरुळकर यांनी सांगितले.

येरुळकर म्हणाले, हे दोन ग्रह तब्बल आठशे वर्षांनी एकत्र आलेले आहेत.हा खूप दुर्मिळ योग आहे. आता ही युती  पुन्हा आपल्याला बघण्यासाठी २०८० पर्यंत वाट पहावी लागणार आहे. अवकाशात अश्या अनेक दुर्मिळ घटना घडत असतात या घटनांचा आणि अंधश्रद्धा यांचा काही संबंध नसून या केवळ नैसर्गिक घटना असल्याचे सांगितले. यावेळी  खगोलप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.