श्री हेडमाळशिद देवाच्या पालखी दर्शनासाठी टोप येथे भाविकांची गर्दी…

0
424

टोप (प्रतिनिधी) : अब्दुललाट येथील श्री हेडमाळशिद देवाची पालखी भक्तांच्या भेटीसाठी नावली या गावातून ३५ किमीवरील टोप (ता. हातकणंगले) येथील कृष्णात सिसाळ या भक्तांच्या घरी आली. या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

या देवाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, काही कारणाने भक्तांना देवाकडे जाण्यासाठी वेळ लागतो यामुळे देवच स्वत: भक्तांच्या भेटीसाठी ज्या त्या गावात जात असतो. पालखी आल्यानंतर भक्त आंबील,  घुगऱ्याचा नैवेद्य दाखवितात. त्यानंतर पालखी पुढील प्रवासास निघते.

काल ही पालखी नावली येथून सातवे गावातील एका भाविकाकडे गेली, तेथून कोडोली येथे आली. आज ही पालखी पेठवडगांवनंतर टोप येथे आली. भक्तांनी या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. उद्या सकाळी ही पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे.