चेन्नई (वृत्तसंस्था) : तमिळनाडूमधील ईसाई धर्म प्रचारक पॉल दिनाकरन यांच्या निवासस्थान आणि कार्यालय असे मिळून २८ ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. ज्या भागात छापेमारी केली आहे, त्यात करुण्या तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्था आणि जीजस कॉल्स मंत्रालयाचा समावेश आहे. यामध्ये कोट्यावधींची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

यावेळी तब्बल साडेचार किलो वजनाचे सोने जप्त केलं आहे. तसेच छापेमारी दरम्यान १२० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळली आहे. हे सोने दिनाकरन यांच्या घरातून जप्त करण्याची आल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. इस्त्राईल, सिंगापूर, ब्रिटन आणि यूएस यासारख्या १२ देशांमध्ये असलेल्या कंपन्या आणि विश्वस्त कंपन्यांकडून २०० हून अधिक बँक खाती आढळली असल्याची माहितीही देण्यात आली आहे. जीजस कॉल्स ही पॉल दिनाकरन यांच्याकडून चालवली जाणारी संस्था आहे, जी संपूर्ण तमिळनाडूमध्ये ईसाई धर्माचा प्रचार-प्रसार करते.