बहिरेश्वर येथील कुंभी नदीपात्रात आढळली मगर : ग्रामस्थांत घबराट

0
131

सावरवाडी (प्रतिनिधी) : बहिरेश्वर (ता. करवीर) येथील कुंभी नदीपात्रात मच्छीमाराला मगरीचे दर्शन झाल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बहिरेश्वरच्या उत्तर बाजूस कुंभी नदी वाहते. मासेमारीसाठी गेलेल्या एका मच्छीमाराला नदीच्या काठावर मगर दिसल्यावर त्याने ग्रामस्थांना ही माहिती दिली. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने मगर पकडण्यासाठी सापळा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.