अकिवाटमध्ये मगर पकडली (व्हिडिओ)   

0
492

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील अकिवाट मध्ये मगर पकडण्यात आली. बस्तवाड रोड स्मशानभूमीजवळ गावातील नागरिकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर मगर फिरताना निदर्शनास आली.  यामुळे परिसरात भीतीची वातावरण पसरले होते. याची माहिती ग्रामस्थांनी त्वरित व्हाईट आर्मी हेलपिंग हँड रेस्क्यू फोर्सला दिली. घटनास्थळी जवानांनी मगरीचा शोध घेतला असता वळवाडे व आवटी यांच्या जनावरांच्या गोट्याजवळ ही मगर गुरूवारी रात्री  ९:३० सुमारास दिसली. यानंतर हेलपिंग हँड रेस्क्यू फोर्स व ग्रामस्थांनी मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली.

यावेळी व्हाईट आर्मी व हेलपिंग हँड रेस्क्यू फोर्सचे निलेश तवंदकर, श्रेयस धुमाळे, विश्वनाथ रजपूत, प्राणी रक्षक अमर पाटील, इम्तियाज मकानदार, आनंद कोष्टी, संतोष गायकवाड, सुनील गावडे, श्रीराम हुजरे, स्वप्नील कुपवाडे, मोसीन तांबोळी, ग्रा.पं. सदस्य सुनील रायदांडे, कुमार तवंदकर, पिंटू वळवाडे आदीसह युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.