सुळे येथे अवैध दारू विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा

0
56

कळे (प्रतिनिधी) :  सुळे (ता.पन्हाळा) येथे वैध दारूची विक्री केल्याप्रकरणी दोघांवर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  धैर्यशील आनंदा सुळेकर (वय ३९,  रा. सुळे ता.पन्हाळा), नंदकुमार पांडूरंग पाटील (रा. मरळी, ता. पन्हाळा)  अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ८ हजार ६८१ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.   

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धैर्यशील सुळेकर यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस उघडयावर दारू विक्री  केली जात होती. तर नंदकुमार पाटील  दारूचा पुरवठा करत होते. याप्रकरणी  बेकायदा माल बाळगल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल  सनिराज पाटील यांच्या फिर्यादीनुसार ही  कारवाई करण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.