इचलकरंजी (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरात राज्य उत्पादन विभाग व गावभाग पोलिसांनी देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला. सुभाष घमडे, सरला नगरकर, नंदा नेतले अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १२५ लिटर देशी दारूच्या ४२ बाटल्या आणि इतर साहित्य असा सुमारे ८, ३५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.