गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या वनहद्दीत वन्य प्राण्यांची शिकार करणार्‍या टोळीला आज (गुरुवार) गारगोटी वनविभागाने पकडले आहे. याप्रकरणी खांडवा मध्यप्रदेश इथल्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर तिरता आमास रजपुत (वय ४०) या महिलेला अटक केली असून दोघेजण फरारी झाले आहेत.

पारदेवाडीच्या वनहद्दीत रानडुकरांसह अन्य वन्य प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर आहेर यांना मिळाली होती. त्यानुसार वनपाल शेवडे, वनरक्षक सुरेखा लोहार यांनी याठिकाणी छापा मारला असता हे तिघेजण शिकार करताना आढळून आले. त्यापैकी दोघाजणांनी पळ ठोकला तर एका महिलेला अटक केली आहे.