गडहिंग्लज येथे ११, १२ वीच्या पुस्तकांची अवैध विक्री करणाऱ्यावर गुन्हा  

0
171

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बालभारतीच्या इयत्ता ११  आणि १२ वीच्या पुस्तकांची बालभारतीच्या वेबसाईट वरून पीडीएफ डाऊनलोड करून त्याच्या प्रती विद्यार्थ्यांना विक्री केल्याचा प्रकार आज (बुधवार) उघडकीस आला आहे. याप्रकऱणी प्रसाद कोकीतकर (वय २२, रा. शिप्पुर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बालभारतीचे व्यवस्थापक माणिक पाटील (रा.कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी प्रसाद याच्या दुकानातून झेरॉक्स मशीन व संगणक जप्त केले आहे.