चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानीविरोधात गुन्हा

0
61

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यात ३० जानेवारीरोजी झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोऱ भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानी याच्याविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील प्रदीप गावडे यांनी  उस्मानी विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

शरजीलवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले होते. दरम्यान, पुण्यातील एल्गार परिषदेचा व्हिडिओ मागविण्यात आला असून त्यातील आक्षेपार्ह भाषणांची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. उस्मानी यांनी एल्गार परिषदेत भाषण करताना हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपनेही कारवाईची मागणी करत राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे.