पंचवीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीतील सात जणांवर गुन्हा

0
68

इचलकरंजी (प्रतिनिधी) : पोलीस ठाण्यात दाखल असलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकी आणि २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीच्या शिवाजीनगर पोलिसात सातजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष सत्यनारायण मानधना, योगेश सत्यनारायण मानधना, विकास गाताडे, विजय गलगले, चंद्रकांत खानाज व त्यांचा मुलगा आणि अशोक दायमा अशी त्यांची नावे आहेत.

हा प्रकार ३ सप्टेंबर २०२० रोजी घडलेल्या या घटनेबाबत धुळाप्पा आप्पा पुजारी (रा. चंदूर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत कारवाई करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिले होते. त्यानुसार पुजारी यांनी उपरोक्त सातजणांच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.