कर्जवसुलीसाठी तरुणांना धमकी देणाऱ्या खाजगी सावकारावर गुन्हा…

0
80

कोल्हापूर (प्रतिनिधी) : न्यू शाहूपुरी परिसरातील महाविद्यालयीन तरुणांना भरमसाठ व्याजाने कर्ज देऊन त्याच्या वसुलीसाठी शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खासगी सावकार मसूद निसार शेख (रा. न्यू शाहूपुरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किशन लालवाणी (रा.पाटणकर कॉलनी, न्यू शाहूपुरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.