कोट्यावधींच्या अपहारप्रकरणी भाजपच्या माजी खासदाराविरूद्ध गुन्हा

0
181

अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या माजी खासदाराविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अहमदनगर अर्बन बँकेत ३ कोटीचा अपहार केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बँकेचे अधिकारी मारुती औटी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  

नगर अर्बन बँकत कोट्यवधीचा अपहार झाला असून त्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सभासदांतून होऊ लागली होती. तसेच याबाबत सभासदांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच प्रशासक यांच्या दालनामध्ये आंदोलनही करण्यात आले होते. याची दखल घेत बँकेचे प्रशासक एस. सी. मिश्रा यांनी अपहारप्रकरणी दोषी असणाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी बँकेचे शाखा अधिकारी मारुती औटी यांना प्राधिकृत केले होते. औटी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली होती.