इचलकरंजीत तरूणाला मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवकावर गुन्हा  

0
572

इचलकरंजी (प्रतिनिधी) : पैसे मागितल्याचा रागातून एका तरूणाला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार अशोक जांभळे यांचे पुत्र नगरसेवक नितीन जांभळे यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तेजस कांबळे (वय २०) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ९) दुपारी अशोक हायस्कूल परिसरात घडला. नगरसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ माजली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तेजस कांबळे यांने १५ दिवसांपूर्वी शैलेश कांबळे व कुमार सूर्यवंशी यांच्याकडे पैसे मागितले होते. हा राग मनात धरून नितीन जांभळे याने तेजसला अशोका हायस्कूल जवळील सायझिंगमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर लाकडी काठीने तेजसच्या हात, पाय व पाठीवर मारहाण करून जखमी केले. याबाबतची फिर्याद जखमी तेजसने शहापूर पोलिसांत दिली. नितीन जांभळे यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.