राजेंद्रनगर येथे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याविरोधात गुन्हा

0
61

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजेंद्रनगर येथे राहत्या घरी आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुनम अनिल चव्हाण  (वय २९, रा. राजेंद्रनगर)  यांनी फिर्याद दिली आहे.  त्यानुसार अनिल राजाराम चव्हाण (वय ३५, रा. राजेंद्रनगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजेंद्रनगर येथे राहत्या घरी अनिल चव्हाण हे आत्महत्येचा प्रयत्न करत असताना त्यांचा गळफास सोडून त्यांना बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पूनम चव्हाण यांनी अनिल चव्हाण यांच्याविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.