मुलीवर अत्याचार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी मोरेवाडीतील तरुणावर गुन्हा  

0
77

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात पीडित मुलीने करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. अभय बाळासाहेब मोरे (वय २२, रा.मोरेवाडी ता. करवीर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोरेवाडी येथे राहणारा अभय मोरे याने एका  अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण करून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले होते.   त्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांने गेल्या ४ वर्षामध्ये त्या मुलीवर वारंवार लैंगिक संबंध ठेवले होते. त्या पीडित मुलीने अभय मोरे याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता अभयने तिला नकार देत जातीवाचक शिवीगाळ करून धमकीही दिली. त्यामुळे त्या पीडित मुलीने अभय मोरे याच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.