कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या घराच्या आडोशाला विदेशी मद्याचा साठा करून ती राजरोस विकल्याबद्दल दिलीप महादेव तामगावे (वय ३९, तामगावे मळा, कोयना कॉलनी, गांधीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ३२ हजार २७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिलीप तामगावे याने आपल्या घराच्या आडोशाला विविध कंपन्यांच्या विदेशी मद्याचा साठा केला होता. या मद्याची तो राजरोस विक्री करत असताना गांधीनगर पोलीसानी त्याला पकडले आणि मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस नाईक आकाश संभाजी पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तामगावे याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.