गारगोटी (प्रतिनिधी) : आदमापूर येथे संचारबंदीचे उल्लंघन करीत विनापरवाना दारात मंडप टाकून गर्दी जमवून लग्नकार्य केल्याबद्दल वरपिता, नवरा-नवरी, भटजीसह ५० लोकांवर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे शिवाजी केरबा पाटील यांच्या मुलाचे लग्न होते. यावेळी विनापरवाना दारात मंडप टाकून कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन न करता लोकांच्या उपस्थितीत  लग्नकार्य केल्याबद्दल वरपिता शिवाजी केरबा पाटील, नवरा मुलगा नितीन शिवाजी पाटील, नवरी मुलगी मयुरी बाजीराव शेटके, संजय केरबा पाटील, किरण कृष्णात मुदाळकर, नामदेव विठ्ठल पाटील हे सर्व (रा. आदमापूर, ता. भुदरगड), भटजी मुकुंद अनंत शुक्ल (रा. मुदाळ ता. भुदरगड) अशोक नायकवडे आणि अनोळखी ४० ते ५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी तुकाराम सुर्यवंशी यांनी दिली आहे.