शाहू नाका परिसरातील तलवार हल्ल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा

0
74

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात मंगळवारी शाहू टोल नाका परिसरातील हेवन पिझ्झा दुकानासमोर पूर्व वैमनस्यातून झालेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी ११ जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सात जणांना अटक करण्यात आली आहे. सद्दाम अब्दुलसत्तार मुल्ला (वय ३१, रा. यादवनगर, कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

यामध्ये हृषीकेश उर्फ गेंड्या चौगले, आसू शेख, अर्जुन ठाकूर, नितीन उर्फ बॉब गाडीयाल, जब्बा उर्फ विराज भोसले, पंकज पोवार, प्रसाद सूर्यवंशी रा. दौलतनगर, कोल्हापूर), सनद देशपांडे, विशाल वगर, साईराज जाधव, रोहित साळुंखे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ऋषिकेश चौगुले, अर्जुन ठाकूर, प्रसाद सूर्यवंशी, सुरज कलगुटी, राजू कलगुटी, आसू शेख, करण सामंत यांना अटक करण्यात आली आहे.