बंदी आदेश झुगारून गांधीनगरात क्रिकेट स्पर्धा : सहा जणांवर गुन्हा

0
46

करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश असतानाही क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल सहाजणांवर गांधीनगर पोलिसात आज (गुरुवार) गुन्हा नोंद झाला आहे. अमित रावलानी, जितू डेंबानी, सनी चंदवाणी, प्रकाश जग्याशी, दीपक आहुजा, शिवम सुंदरानी हे (सर्व रा. गांधीनगर) अशी त्यांची नावे आहेत.

२३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत कुटिया मंदिरापाठीमागे सिंधी समाजाच्या मैदानावर क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले होते. गांधीनगर पोलिसांनी क्रिकेट स्पर्धेला परवानगी नाकारली होती. तरीही क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. यामुळे आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र कोव्हिडच्या उपायोजनांच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजी आनंदा पाटील यांनी गांधीनगर तपास दिली आहे. अधिक तपास गांधीनगर पोलिस ठाणे करीत आहे.