कृतिशील विचार आणणारे छ. शाहू महाराज समजणे गरजेचे : अॅड. संभाजीराव मोहिते

0
46

गारगोटी (प्रतिनिधी) : माणसाचे मन जपण्यासाठी तो माणूस असावा लागतो. तो माणूस राजर्षी शाहू महाराजांच्या रुपाने आमच्या मातीत घडला. पण कृतिशील विचार आणणारा हा राजा आम्हाला का समजला नाही ? हे अजूनही आम्हाला कळलेले नाही, असे प्रतिपादन अॅड. संभाजीराव मोहिते यांनी केले.

शाहू वाचनालयाचे अध्यक्ष व माजी आ. आनंदराव कोडिंबा देसाई तथा आबाजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या ‘छत्रपती शाहू राजा आणि माणूस’ या जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. बिद्री कारखान्याचे चेअरमन व माजी आ. के.पी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी आबाजींच्या व्यक्तिमत्वावर प्रकाशझोत टाकणारी कविता सादर केली. यावेळी आबाजींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘ऋतुआनंद’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष बी.एस.देसाई, भुदरगड तालुका शेतकरी संघाचे उपाध्यक्ष प्रा. बाळकाका देसाई, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे तालुका अध्यक्ष आर. एन. कारखानीस, गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे, मौनी विद्यापीठाचे संचालक आर. डी. बेलेकर, जि. प. सदस्या रेश्मा देसाई, पं.स.सदस्या गायत्री भोपळे, मौनी विद्यापीठाचे चेअरमन भाऊतात्या देसाई, कराड मार्केट कमिटीचे चेअरमन रंगराव  थोरात, प्राचार्य डॉ. सुभाष देसाई, शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त डीन सोपानराव चव्हाण, मौनी विद्यापीठाचे विश्वस्थ मधुकर देसाई, बिद्रीचे संचालक धोंडिराम मगदूम, प्रदिप पाटील, तालुका संघाचे उपाध्यक्ष एम.डी.पाटील, ग्रा.प. सदस्या मेघाराणी देसाई, प्रा विजय जामदार, बिद्रीचे माजी संचालक प्रकाश देसाई, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रणजित देसाई, के एच कॉलेजचे सेवानिवृत्त प्रबंधक, बी. बी. सोळसे, बी.एस माने आदी उपस्थित होते.

टी. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई यांनी स्वागत केले. तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शामराव देसाई यांनी आभार मानले.