मुलांच्या भांडणावरून दाम्पत्यास मारहाण; तिघांवर गुन्हा

0
77

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे येथील लहान मुलांच्या भांडणावरुन दाम्पत्यास चिवाच्या काठीने मारहाण केल्या प्रकरणी तिघांविरुद्ध कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नथुराम कांबळे, संतोष कांबळे, सागर कांबळे यांच्याविरुद्ध कृष्णात केरबा कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी कृष्णात कांबळे व नथुराम कांबळे, संतोष कांबळे, सागर कांबळे हे नात्याने एकमेकांचे चुलते-पुतणे आहेत. शुक्रवारी सकाळी कृष्णात कांबळे यांच्या दारात चुलते नथुराम कांबळे हे त्यांच्या पत्नीस लहान मुलांच्या भांडणावरून शिवीगाळ करत होते. याबाबत कृष्णात कांबळे यांनी जाब विचारला असता नथुराम कांबळे यांनी चिव्याच्या काठीने कृष्णात यांच्या पाठीत मारहाण केली. त्यांची पत्नी सोडवण्यास गेली असता तिच्या उजव्या हातावर मारहाण केली. नंतर संतोष कांबळे, सागर कांबळे यांनी फिर्यादीची गळपट्टी धरून जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ केली. पुढील तपास सपोनि प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉ. जाधव करत आहेत.