बेळगाव (प्रतिनिधी) : येथील काँग्रेस रोडवरील रेल्वे रुळावर दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यामध्ये पती ठार झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. घटनेची नोंद रेल्वे पोलिसात झाली आहे.

राकेश पाटील (वय ३५) असे मयत झालेल्याचे नाव आहे. तर अस्मिता पाटील गंभीर जखमी झाल्या आहेत. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पती मृत झाला आहे तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याबाबत रेल्वे पोलिस अधिक तपास करीत आहेत.