विशाळगडावरील अतिक्रमणासंदर्भात ‘पुरातत्त्व’शी पत्रव्यवहार करणार : खा. संभाजीराजे

0
109

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून तत्काळ पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे आश्वासन छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी दिले. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने त्यांना आज (शुक्रवार) निवेदन देण्यात आले.

या वेळी मागील काही वर्षांत विशाळगडावर ६४ अतिक्रमणे झाल्याचे बाबासाहेब भोपळे यांनी निदर्शनास आणून दिले. यावर छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, तुम्ही या विषयाचा चांगला अभ्यास केला आहे. काही दिवसांपूर्वी मी विशाळगड येथे भेट दिली होती तेव्हा तेथे पुष्कळ अस्वच्छता होती. या प्रकरणी मी स्वत: लक्ष घालेन.

या वेळी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक किरण दुसे, सदस्य सर्वश्री चंद्रकांत बराले, राजू यादव, शरद माळी,  बाबासाहेब भोपळे, शिवानंद स्वामी उपस्थित होते.