Published October 23, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या घरफाळा घोटाळाप्रकरणी अद्याप संजय भोसले यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाहीये. चार दिवसांत जर कारवाई झाली नाही तर महापालिकेच्या दारात २८ ऑक्टोबर  रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा नगरसेवक भूपाल शेटे यांनी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना पत्राद्वारे दिला आहे.  

शेटे यांनी पत्रकात म्हटले आहे की, घरफाळा घोटाळ्याच्या १४ ऑगस्ट रोजीच्या अंतिम अहवालामध्ये संजय भोसले व इतर कर्मचारी यांना दोषी ठरविले असून त्यांच्यावर अदयापपर्यंत कारवाई झालेली नाही. तसेच संजय भोसले हे अति. परिवहन व्यवस्थापक नसताना त्यांनी मागील ८ वर्षे कोमनपाचे वाहन व त्यावरील चालक यांचा वापर केला असून यावर झालेला खर्च रु. ५५ लाख त्यांचेकडून वसूल करून त्यांचेवर बडतर्फीची कारवाई झाली नसलेबद्दल मी महापालिकेच्या कार्यालयाजवळ २८ रोजी आमरण उपोषण करणार आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023