कोल्हापुरातील महिलेवर अत्याचार प्रकरणी नगरसेवक पुत्र अटक…

0
182

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून कोल्हापूरातील प्रतिभानगर परिसरातील एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी इस्लामपूर येथील एका नगरसेवकाच्या पुत्राला आज (गुरुवार) ताब्यात घेतले आहे. अमित आनंदराव मलगुंडे असे त्याचे नाव आहे.

मूळची सांगली येथील रहिवासी असणारी ही पिडित महिला आपल्या कुटुंबीयांसमवेत कोल्हापुरात राहत होती. तिच्याशी संशयित आरोपी अमित मलगुंडे याची ओळख होती. ओळखीचा फायदा घेऊन मलगुंडे यांने  लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. मात्र, लग्नास नकार दिला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अमित आनंदराव मलगुंडे या संशयिता विरोधात बुधवारी रात्री शाहूपुरीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी इस्लामपूर येथील विद्यमान नगरसेवकाचा मुलगा अमित मलगुंडे याला आज सकाळी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील या पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.