महापालिकेचा सहा हजार जणांवर कारवाईचा दणका   

0
58

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दहा दिवसात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून ५ हजार ८११ जणांकडून ६ लाख ४७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे तसेच रात्री ९ नंतर आस्थापना सुरु न ठेवणे, या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात याचा भंग केल्याबद्दल दहा दिवसात ६ लाख ४७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आली आहे. दंडाचा दणका ५ हजार ८११ जणांना बसला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. शहरात प्रमुख रस्त्यावर पथके कार्यरत आहेत. ते विना मास्क येणाऱ्यांना हेरून कारवाई करत आहेत.