महानगरपालिकेकडून टोप येथील खाणींच्या हद्दीची मोजणी…

0
345

टोप (प्रतिनिधी) :  टोप येथील गट नं ५२० मधिल ५ हेक्टर ६४ आर ५६५ मधिल १ हेक्टर ३९ आर इतकी जमिन कोल्हापूर महापालिकेच्या नावे दफ्तरी नोंद झाली आहे. या खाणीच्या अंतिम हद्दीची मोजणी आणि पाहणी महानगरपालिका, महसूल व भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या क्षेत्राची मोजणी प्रक्रिया ईटीएस यंत्राच्या साहाय्याने २५ जानेवारी २०२१ रोजी पूर्ण करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव हद्दी दाखविण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे आज (गुरुवार) रोजी हद्दी दाखवून मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. महापालिका  प्रतिनिधी आणि गट नं ५२० च्या लगत क्षेत्र असलेल्या जमीन मालकांना ही उपस्थित राहण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने हद्द दाखविण्याची प्रक्रिया आज राबविण्यात आली आली.

टोप ग्रामपंचायत व कोल्हापूर महानगरपालिका यांच्यात टोप येथील खाणीची जागा कचरा टाकण्यास देण्यावरून न्यायालयीन वाद सुरू होता. पण सदर जमिनिच्या सातबारा दप्तरी कोल्हापूर महापालिकेचे नावं नोंद झाली. त्यामुळे आज अंतिम हद्दी फायनल करून जमिन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. या मोजणीला स्थानिकांचा विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता शिरोली पोलिस ठाण्याने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. परंतु, टोप ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांपैकी कोणीही न आल्यामुळे ही अंतिम हद्दी पहाणी प्रकिया सुरळीतपणे पार पडली.

यावेळी कोमनपाचे डॉ. विजय पाटील, टाऊन प्लॅनिंगचे शामसुंदर शेटे, नंदकुमार पाटील, सुनिल ठोंबरे, प्रविण बावडेकर, भुमी अभिलेख राहुल पाटील, वडगाव मंडल अधिकारी गणेश बर्गे, कोतवाल सचिन कांबळे, शिरोली ठाण्याचे सपोनि. राजेश खांडवे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.