कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तब्बल १९९९ जणांना कोरोनाची लागण झाली असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १७९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३१८ तर करवीर तालुक्यात ४३५ तर हातकणंगले तालुक्यात २५० रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३१८, आजरा- १०७, भुदरगड- ५१, चंदगड- २७, गडहिंग्लज- ८२, गगनबावडा – २०, हातकणंगले – २५०, कागल- १२१,  करवीर- ४३५, पन्हाळा- ११६, राधानगरी- ५६, शाहूवाडी – ६६, शिरोळ – १७६, नगरपरिषद क्षेत्र- १४८, इतर जिल्हा व राज्यातील- २६ अशा १९९९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ७८, १८५ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ५९, ५९३ 

मृतांची संख्या,०८६

उपचार सुरु असलेले रूग्ण१३, ५०६