नाशिक महापालिकेसमोर ऑक्सिजन सिलिंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधिताचा मृत्यू

0
31

नाशिक (प्रतिनिधी) : अनेक रुग्णालये फिरुनही बेड मिळत नसल्याने दोन कोरोनाग्रस्त रुग्णांनी ऑक्सिजन सिलिंडरसह नाशिक महापालिकेसमोर बुधवारी  आंदोलन केले होते.  दरम्यान, दोन  कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकाचा रात्री मृत्यू झाला. 

कोरोनाग्रस्तांनी केलेल्या आंदोलनामुळे महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली होती. महापालिका प्रशासनाने ऑक्सिजन सिलिंडरसह आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला बिटको रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, मध्यरात्री त्या रुग्णाची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णाला आंदोलन करण्यासाठी महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर पालिकेकडून कारवाई होणार आहे. बेड मिळत नसल्याने संबंधित रुग्णाला महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.