नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यावर प्रतिबंधात्मक लस निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जुलै २०२१ पर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोना प्रतिबंध लस दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

कोरोनावरील लस निर्मितीसाठी विविध कंपन्या प्रयत्न करीत आहेत. काही कंपन्यांची लस दुसऱ्या, तिसऱ्या टप्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले, भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याचे सरकारचे नियोजन आहे. सुमारे २० ते २५ कोटी लोकांपर्यंत पुढच्या वर्षापर्यंत लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल.