कोरोना लस या दिवसापासून मोफत

0
55
(प्रतीकात्मक छायाचित्र)

नवी दिल्ली (प्रतिनिधी): कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. आता १ मार्चपासून  या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेले ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास प्राधान्य देण्यात येईल.

कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पोलिस आणि शिक्षकांचे लसीकरण पार पडले.
या लसीकरणासाठी दहा हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. सरकारी केंद्रांवर कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. तर खासगी रुग्णालयामध्ये लस घेणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहे. लसीसाठी किती पैसे मोजावे लागतील याबाबत उत्पादक आणि रुग्णालयांशी चर्चा करुन आरोग्य मंत्रालय तीन ते चार दिवसात निर्णय घेईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.