इचलकरंजी (प्रतिनिधी) : शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक लस ४५ वर्षांवरील नागरिकांना देण्याचे आदेश काढले होते. आता त्यानंतर राज्य शासनाच्या सूचनेनुसार १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. त्यानुसार इचलकरंजी शहरातील लालनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणास आज (शुक्रवार) सुरूवात झाली.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. दररोज २०० जणांचे लसीकरण होणार आहे. या मोफत सुविधेमुळे नागरिकांना खाजगी रुग्णालयात जादा पैसे भरून लस घ्यावी लागणार नाही. या वेळी आ. प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा अलका स्वामी, नगरसेवक मदन कारंडे, माजी आ. राजीव आवळे, आरोग्य सभापती संजय केंगार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, नगरसेवक राहुल खंजिरे, संजय कांबळे, मुख्याधिकारी प्रदिप ठेंगल, पो. नि. गजेंद्र लोहार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दातार,  डॉ. मिनल पडियार आदी उपस्थित होते.