यड्राव (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील यड्राव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज (मंगळवार) कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. यड्राव ग्रामपंचायतिने या संबंधीचा प्रस्ताव तालुका आरोग्याधिकारी दातार यांच्याकडे दिला होता. त्यांच्या प्रस्तावास जिल्हा आरोग्याधिकारी साळे  यांनी मान्यता दिली. या आरोग्य केंद्रावर मंगळवार ते शुक्रवारपर्यंत लसीकरण असणार आहे.

या लसीकरणाचे उदघाटन जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, माजी ग्रा. प. सदस्या सवितादेवी नाईक-निंबाळकर आणि कल्पना लढा यांच्या हस्ते करण्यात आले.  यामध्ये एकूण लाभार्थ्यांची संख्या दोन हजार आहे. आज पहिल्याच दिवशी या लसीकरणामध्ये 120 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसचे गावामध्ये लसीकरणाच्या जनजागृतीसाठी रिक्षामधून जनजागृती करण्यात येत होती. यावेळी सोशल डिस्टन्स आणि मास्कचा अवलंब करूनच लस देण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी ही लस घ्यावी, असे आवाहन सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर आणि उपसरपंच प्राची हिंगे यांनी केले.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भाटे, आशा स्वयंसेवीका कलावती जाधव, अनिता निराळे, सुनीता प्रभाळकर, अनिता वाईगडे, राणी कोळी, सनम प्रभाळकर, सुवर्णा बोदगे, कल्पना यादव, मयुरी काळगे, ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते.