कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात  तिसऱ्या टप्प्यामध्ये ६ लाख ६१ हजार नागरिकांना  लस देण्यात येणार आहे . यामध्ये ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६९  वर्षातील व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठीही लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १२० केंद्रांवर ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.    

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत  कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली.  यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीकरणासाठी प्राथमिक नोंदणी आवश्यक आहे. ही नोंदणी ऑनलाइन किंवा स्पॉट  रजिस्ट्रेशन द्वारे करता येणार आहे. रजिस्ट्रेशन ‘आरोग्य सेतू’  या अॅपवर करून शासकीय रुग्णालयमध्ये ही लस मोफत देण्यात येणार आहे. परंतु १५  खासगी रुग्णालयांमध्ये ही लस २५०  रुपये शुल्क आकारून देण्यात येणार आहे.  तसेच व्याधीग्रस्त  नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ही लस जिल्ह्यातील सरकारी रूग्णालये आणि महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमधून देण्यात येणार आहे.

‘या’ खासगी रूग्णालयात होणार लसीकरण –

१)देसाई हॉस्पिटल आणि  संत गजानन महाराज हॉस्पिटल,  गडहिंग्लज

२)कुडाळकर हॉस्पिटल, पेठवडगाव

३) ऱ्हद्या  हॉस्पिटल, हेर्ले

४)अलायन्स हॉस्पिटल, इचलकरंजी

५) सिद्धीगिरी हॉस्पिटल, कणेरी

६) अथायू हॉस्पिटल उजळाईवाडी

७)यशवंत धर्मादाय हॉस्पिटल, कोडोली

८)संजीवनी हॉस्पिटल, बोरपाडळे

९) शतायू हॉस्पिटल, कोल्हापूर

१० ) केपीसी हॉस्पिटल कोल्हापूर

११) अॅपल हॉस्पिटल कोल्हापूर

१२ ) डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल कोल्हापूर

१३) डायमंड हॉस्पिटल कोल्हापूर

१४ ) सिध्दीविनायक नर्सिंग होम कोल्हापूर