कोरोना अपडेट : जिल्ह्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, तर एकाचा मृत्यू

0
2612

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र चोवीस तासांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. तब्बल ४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३१ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. कोल्हापुरातील रामानंदनगर येथील एकाचा मृत्यू झाला असून ३९४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

कोल्हापूर शहरातील ३२, आजरा तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील -१, हातकणंगले तालुक्यातील २, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकूण ४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती पुढीलप्रमाणे – :
एकूण रुग्ण – ५०, २५३, डिस्चार्ज – ४८, ३४०, उपचारासाठी दाखल रुग्ण – १७५, मृत्यू – १७३८