कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ३८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७३६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या जिल्ह्यातील प्रत्यक्ष रुग्णांची संख्या आठशेपेक्षा कमी झाली आहे.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात ३८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर शहरातील १, चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील १, आजऱ्यामधील १ अशा ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४८,३७३ झाली असून ४५, ९६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण १६५१ जणांचा मृत्यू झाला असून ७६० जणांवर उपचार सुरु आहेत.